
नागपूर : दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सॲप बेस डिजिटल होम असिस्टंट या स्वाध्याय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पायाभूत स्वाक्षरता व संख्या ज्ञान वाढविण्यासाठी प्रश्न मंजूषा फोनवर उपलब्ध करून देण्यात येत असून, या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत या उपक्रमाची सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क व संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सॲपचा वापर यासाठी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 918595524515 हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या व्हॉट्सॲप क्रमांकावर विद्यार्थ्यांनी हलो किंवा नमस्कार, असे पाठवून सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. तसेच व्हॉट्सॲपवर विचारल्या प्रश्नांची अचूक उत्तरेसुद्धा द्यायची आहेत.
स्वाध्यायअंतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्न पाठविले जातील आणि त्यानंतर नियमितपणे प्रश्न पाठविणे सुरू राहणार आहे. इयत्ता पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फोनवर या उपक्रमाच्या माध्यमातून प्रश्न मंजूषा घरच्या घरी फोनवर उपलब्ध होईल व त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी व पालकांना यासंदर्भात माहिती उपलब्ध होईल.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान वाढविण्यास मदत होईल. प्रारंभी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यामांसाठी मराठी व गणित विषय सुरू झाले असून, इतर विषयांचा सुद्धा स्वाध्याय उपक्रमात समावेश होणार असल्याची माहिती कुंभेजकर यांनी दिली.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.